Sunday, January 10, 2016

स्टार्ट अप साठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घ्यावा

भारतात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय संस्था, बँका, सार्वजनिक उद्योग यात नोकरभरतीचा वेग अतिशय मंदावला आहे. उद्योगधंद्यांची वाढही काही ठराविक क्षेत्रात व मोठ्या शहरांमध्ये होत असल्याने ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक पातळीवर नोकरीच्या संधी फार कमी झाल्या आहेत.
याचवेळी  अनेक विद्याशाखांमध्ये शिक्षण देणार्‍या संस्थांचे जाळे सर्व भागात पसरले आहे. परिणामी सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या तरुणांना त्याच्या योग्यतेनुसार उद्योग/ व्यवसायात संधी मिळण्यासाठी उद्योगातही त्याच गतीने प्रगती होणे आवश्यक आहे.

 भारत सरकारने या समस्येवर उपाय काढण्यासाठी ‘स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया’ या नावाची महत्वाकांक्षी चळवळ सुरू केली आहे. सरकारच्या आवाहनानुसार अनेक मोठे उद्योग आणि  भांडवल पुरविणा‍र्‍या  बँका व इतर संस्था नवयुवकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण वा अल्प दरात भांडवल पुरविण्यास मदत करण्यास तयार होत आहेत. तरीही या योजनांचा लाभ घेऊन नवा उद्योग सुरू करण्यास  किती युवक पुढे येतील व त्यातले किती यशस्वी होतील हे सांगणे अवघड आहे.

कारण उद्योगासाठी केवळ भांडवल आणि तंत्रकौशल्य पुरेसे नसते तर  संघटन, व्यवस्थापन, कायदेकानू, बाजारस्थिती, मागणी, ग्राहकवर्ग, स्पर्धक यांची माहिती व प्रत्यक्ष अनुभव यांची गरज असते. याशिवाय  भारतातील नवशिक्षित तरुणापुढे कौटुंबिक जबाबदार्‍या, शिक्षणासाठी पैसा खर्च झाल्यामुळे सुरुवातीपासून नियमित ठराविक उत्पन्नाची आवश्यकता, शिक्षणाप्रमाणे वाढलेल्या आकांक्षा, भोवतालच्या समाजाकडून त्याच्याबद्दल अपेक्षा अशा अनेक समस्या असतात.

परदेशात नाविन्यपूर्ण कल्पनेसाठी स्वत:च्या हिमतीवर व उद्योगातील संभाव्य तोट्याचा धोका पत्करून भांडवल देणार्‍या ( व्हेंचर कॅपिटल ) संस्था असतात. भारतातही आयटी सारख्या काही मोजक्या क्षेत्रात असे सहकार्य करणार्‍या  संस्था उदयास आल्या आहेत. मात्र त्यांची संख्या फारच कमी आहे.  स्टार्ट अप उद्योगाचे अल्पावधीत मोठ्या कार्पोरेट संस्थेमध्ये रुपांतर झाल्याच्या काही बातम्या आपण वाचतो मात्र बंद पडलेल्या व अयशस्वी स्टार्ट अप संस्थाही त्यापेक्षा अनेक पटीनी जास्त असतात हे आपल्या लक्षात येत नाही.

भारतातील स्टार्ट अप साठी नाविन्यपूर्ण कल्पना हवी असे मला वाटत नाही. अगदी छोट्या भांडवलावर स्थानिक गरजा भागविणारा कोणताही साधा उद्योग वा सेवा व्यवसायही यशस्वी स्टार्ट अप होऊ शकेल. मात्र त्यासाठी सुस्थितीतील ज्येष्ठ नागरिकांनी नेतृत्व स्वीकारून आपली आवड, अनुभव वा गरज लक्षात घेऊन योग्य त्या उद्योग वा व्यवसायात पदार्पण करावे नवशिक्षित तरूणांना यात सहभागी करून आर्थिक पाठबळ द्यावे. असे स्टार्ट अप यशस्वी होतीलच पण त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना समाजात एक नवे आदराचे स्थान मिळेल. कौटुंबिक आधार व मदत मिळेल तसेच तरुणांबरोबर काम केल्याने नवजीवन प्राप्त हॊईल.

निवृत्त झाल्यावर अध्यात्म वा समाजसेवा यात आपले तन मन गुंतविणारे अनेकजण आहेत. मात्र धन गुंतविताना मात्र आकर्षक व्याज वा परतावा देणार्‍या पर्यायांचाच विचार केला जातो. यातही हे धन  दुसर्‍या कोणाच्या उद्योगासाठीच वापरले जात असते व त्यावर आपले नियंत्रण नसते.

आपल्या अनुभवाचा, कौशल्याचा उपयोग करून उद्योग सुरू करण्यासाठी यातील काही  हिस्सा वापरावयाचा असे ठरविले तरी एक स्टार्ट अप जन्मास यॆईल. काही युवकांना रोजगार मिळेल. त्यातील काही मोठे उद्योजकही बनतील. सर्व ज्येष्ठांनी हे एक राष्ट्रकार्य म्हणून अमलात आणायचे ठरविल्यास अनेक छोटे  उद्योग उभे राहतील व स्टार्ट अप इंडियाचे स्टँड अप इंडियामध्ये रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही.

Friday, January 8, 2016

Startup by Seniors



Govt. of India has taken a welcome step to boost startups by providing low interest Easy loan. However,  lot more needs to be done  for startups to succeed. Generally unemployed youth in India  faces many problems like tough competition, expectations from family and society, psychological depression leading to urgency of financial stability.  In most of the cases,  the family has spent lot of money to educate the youth and is not ready to face uncertainty of business success.  Naturally it opposes the idea of starting business  by taking loan and press for getting secure job with assured income.

No doubt, any business  requires  financial seed capital but  there are many other requirements which unemployed youth cannot manage on his own.  Any  business  requires some form of organization, group of working people,  market research, development of  customer base and experienced management. Fresh graduates do not have exposure to market realities and need help, guidance and financial support till the business becomes sustainable.

 Government cannot meet all the requirements and the lead should come from financially stable senior people who are retired from successful career or service.  Retired people have lot of experience and ideas for doing business, they have financial stability  but are unable to pursue their aspirations due to age induced limitations. Such people should come forward and take a leading role in   startup business. This would provide a safe and strong platform for unemployed youth  to come together and start business with active leadership role by senior.

Dnyandeep Infotech Pvt. Ltd.  is the outcome of such experiment. It was established in year 2000 by me in  IT field with the help of fresh young graduate engineers . Though the company could not grow like any other famous startups, it provided full freedom to ideas and efforts of young aspirants. It provided a much needed   platform with  earn and learn policy.  Many of Dnyandeep’s employees  joined high paid jobs, some  could secure foreign assignments and some have established their own startups  Dnyandeep Infotech  did not grow but  could sustain all odds and evens for last fifteen years.  

It also gave immense pleasure to me and my family. I could remain busy in my retirement period, share my ideas with young  and the experience kept me in the status of young student struggling to know latest and try new ideas. The staff at Dnyandeep has become part of our family and we do not feel alone or separated from children, even though both of them are in US.

I appeal to seniors to take up the challenge of making startups successful by venturing your funds, knowledge and ideas with young enthusiastic youth who are ready to work and develop your business .

Thursday, January 7, 2016

श्रीनिवास रामानुजन् यांचा जादूचा चौकोन

महान भारतीय गणितज्ञ  श्रीनिवास रामानुजम यांचा जादूचा चौकोन

रामानुजन् हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

या महान गणितज्ञाचा जन्म डिसेंबर २२, १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले.त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.

त्यांनी तयार केलेला संख्यांचा तक्ता किंवा जादूचा चौकोन त्यांच्या अलौकिक बुद्धीमत्तेची चुणूक दाखवितो. श्रीनिवास रामानुजम यांचा जादूचा चौकोन

आ्डव्या ओळीतील संख्यांची बेरीज = १३९

उभ्या ओळीतील संख्यांची बेरीज = १३९

तिरक्या ओळीतील संख्यांची बेरीज = १३९

चारही कोपर्‍यातील संख्यांची बेरीज = १३९

मधल्या चार संख्यांची बेरीज = १३९

कोपरे व मधल्या चार संख्या सोडून राहिलेल्या संख्यांची बेरीज = १३९

श्रीनिवास रामानुजन् यांची जन्मतारीख = पहिल्या ओळीतील संख्या २२-१२-१८८७