Wednesday, September 9, 2015

अँड्रॉईड प्रोग्रॅमिंग – भाग २

अँड्रॉईड ऍपचे डिझाइन करण्यासाठी ज्या फोल्डरमध्ये आपण प्रोग्रॅम ठेवतो. त्याला workspace असे म्हणतात. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला workspace चे  फोल्डर कोणते वापरायचे हे निश्चित करावे लागते. एकदा workspace फोल्डर ठरले की आपण करीत असलेले सर्व अँड्रॉईड ऍप या फोल्डरमध्येच रहातात. एक्लिप्स एका वेळी एकाच वर्कस्पेसचा वापर करू शकते. त्यामुळे दुसर्या फोल्डरमध्ये असणारे प्रोग्रॅम वापरावयाचे असल्यास ते import  करावे लागतात. अर्थात आपल्याला वर्कस्पेस बदलता येते.


 यापुढचा टप्पा म्हणजे केलेले ऍप मोबाईलवर कार्यान्वित केल्यानंतर कसे कार्य करेल हे पाहण्यासाठी आपल्या कॉम्प्युटरवरच आपल्याला एक आभासी मोबाईल निर्माण करता येतो. त्यासाठी  वरच्या मेनूमधील window मेनूतील AVD Manager (Android Virtual Device Manager)  ही सुविधा वापरता येते. या सुविधेच्या साहाय्याने  आपल्याला हवा त्या प्रकारचा मोबाईल आपल्याला निर्माण करता येत असल्याने आपले ऍप सर्व प्रकारच्या मोबाईलवर कसे कार्य करेल याचे परिक्षण करणे सुलभ होते.  AVD Manager या मेनूवर क्लिक केले की खालील स्क्रीन दिसतो. व त्यात कोणत्याही नावाने व आवश्यक ते पर्याय निवडून आभासी मोबाईल कार्यान्वित करता येतो.


No comments:

Post a Comment