Monday, January 31, 2011

Thoughts of IT Entrepreneurs

“The first thing you learn about entrepreneurship is that there is always a ‘time dimension’. Tomorrow is not OK; it has to be done today. You always have fixed budget- you never have what you want. Your resources are always constrained. But if you are determined and give your best, you can succeed.”
- S. S. Kshatriya, Silicon Valley Greats

“I think it’s sometimes your ability to trust other people that helps. It is not the destination that is of interest, it is the journey that is of paramount importance.”
- K. B. Chandrasekhar, Exodus

“Indians are smart, creative and hard working people. India is poor with all the resources it possesses. India is poor because of wrong economic policies and vision. Entrepreneurship has been long suppressed in India. Wealth has been squandered in unproductive activities. I believe, India has potential of being a super power. No doubt, it requires a great deal of political will and leadership to push India forward. What is required is that if you feel very strongly about something, you should lead the way by actions and by setting an example. People should build their own schools and hospitals. The government’s presence should be minimal in day today life.”
- Kanval Rekhi, Excelan

“Notice the opportunity in future and convert it into business. Life is asset of opportunities and circumstances- wherever you do, you have to work hard.”
Pradeep Kar, Microland

“Founders must know that a company in its formative years is made of a few good people and the 80:20 rule applies here as well. 20% of the people do 80% of the job. Take care that you don’t loose key persons. Empower key persons to to build their own team. Hiring one’s own team gives two things: a sense of ownership to manager and a sense of loyalty to the new recruit. Hiring known people through personal network brings the best people and helps develop a good chemistry. Aiming high with a big picture is a key to building a large company. As an entrepreneur, one’s company should have large goals, focus on an achievable subset of it, and develop a corresponding operational plan to manage that subset. Put the rest on company’s roadmap, so as not to lose sight of it.

The old rule of wearing multiple hats does not apply here. The principle is one person for one job and the right person for the right job. Otherwise things don’t get done in time. A CEO should never limit the growth of his company because of the limits of his own experience and the bandwidth of his capabilities.”
- Raj Singh, Digital Design and Verilog HDL

When a startup becomes successful, either a larger company buys it or it goes public. Either way its shares acquire value. For example suppose an employee is offered 50,000 shares at one cent per share. Thus for $500, he becomes eligible for a large number of shares. If the company share opens at $20 a share, the employee is worth $1 million immediately.
- S. S. Kshatriya, Silicon Valley Greats

Technology is the ticket to the game and not the name of the game. You have to find out how much is your space, and how much is your company’s space. It is important to learn to share. You have to find your own balance, and hang on to it.
- Umang Gupta, Gupta Technologies

Infosys Technologies is a corporation by professionals for the professionals.
Its businessplan- Source capital from where it is cheapest, produce where it is most cost-effective and sell where it is most profitable.
- N. R. Narayana Murthy

(Ref. S. S. Kshatriya, Silicon Valley Greats)

Friday, January 14, 2011

जलाशयातील पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण

जलाशयातील पाण्याचे स्तरीभवन -
पाण्याच्या तापमानात खोलीप्रमाणे बदल होत असल्यामुळे जलाशयातील पाण्याचे निरनिराळया तापमानाप्रमाणे निरनिराळया थरात वर्गीकरण करता येते. अशी विभागणी म्हणजेच स्तरीभवन होय.

येथे ऑक्सिकरण (Oxidation) व अपचयन(Reduction) या दोन्ही क्रिया घडत असतात हे लक्षात ठेवले पाहिजे. पृष्ठभागावरचे पाणी गरम असल्याने खोलीवरच्या गार पाण्यापेक्षा त्याचे विशिष्ट गुरुत्व कमी असते. त्यामुळे साठलेल्या पाण्याचे स्तरीभवन होऊन ऑक्सिकरण व अपचयन अशा परस्परविरोधी क्रिया एकाचवेळी चालल्याचा विराधाभास निर्माण होतो.

मात्र पृष्ठभागालगतचे पाणी ४सें. पर्यंत थंड होते. तेंव्हा त्याचे विशिष्ट गुरुत्व (specific gravity) सर्वात जास्त होऊन ते तळाशी जाते व तेथील विस्थापित गरम पाणी सुद्धा ४सें. पर्यंत थंड झाल्यावर पुन्हा तळाकडे परत येते. पाण्याच्या साठ्यातील सर्व पाण्याचे तापमान ४सें. एवढे थंड होईपर्यंत ही क्रिया चालू राहते. त्यापेक्षा पाण्याचे तापमान कमी झाले की त्याचे विशिष्ट गुरुत्व कमी होते. कारण पाण्याचा एक विशिष्ट गुणधर्म असा आहे की त्याची घनता ०सें. पेक्षा ४सें. लाच जास्तीत जास्त असते. जर हवेचे तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले तर त्याहीपेक्षा कमी विशिष्ट गुरुत्वाच्या पाण्याचे बर्फात रूपांतर होते. पाणी गोठत असताना ते प्रसरण पावते व त्यामुळे बर्फ पाण्यावर तरंगतो.

उन्हाळा सुरू झाल्यावर पृष्ठभागावरील ४सें. तापमानाचे पाणी, त्याच्या सान्निध्यातील हवा व सूर्यप्रकाशामुले गरम होऊ लागते. ही क्रिया पाण्याच्या पृष्ठभागाखालील ५ ते १० मीटर खोलीपर्यंतचे पाणी गरम होईपर्यंत चालू राहते व यावेळी त्यापेक्षा जास्त खोलीवरचे पाणी थंड राहते. त्यावेळी त्या दोन थरांमध्ये विशेष भिन्नता आढळून येतेव यांना जोडणाऱ्या मधल्या थरामध्ये तापमानाी जलद उतार झालेला दिसून येतो. मधल्या अरूंद थरातील या तापमान उताराला थर्मोक्लाईन असे म्हणतात. ( थर्मोक्लाईन - दोन भिन्न तापमान असणाऱ्या पाण्याच्या थरांना जोडणाऱ्या अरुंद थरातील तापमानात होणारा बदल दाखविणारी आलेखावर काढता येणारी रेषा). येथे प्रत्येक मीटर खोलीला १सें. किंवा त्यापेक्षा जास्त तापमानाचा फरक आढतो. थर्मोक्लाईनच्या पातळीची पृष्ठभागाखाली असणारी खोली, हवामानविषयक परिस्थिती, जलाशयाची खोली व क्षेत्रफळ आणि वाऱ्यामुळे प्रवाह निर्माण होण्याची व लाटांमुळे पृष्ठभाग ढवळला जाण्याची शक्यता, या सर्व गोष्टींवर अवलंबून असते.

ज्याठिकाणी पाण्याचे तापमान ४सें. च्या खाली जात नाही अशा जलाशयाच्या पृष्ठभागावरील हवा, पाणी व सूर्यप्रकाशामुळे गरम होते. हे गरम पाणी, वार्‍यामुळे निर्माण झालेल्या प्रवाहांच्या योगे खालच्या गार पाण्यात मिसळते. परंतु या प्रवाहांच्या मर्यादेपेक्षा जास्त खोलीवरच्या पाण्याचा थर सदैव थंड राहतो. अशा परिस्थितीत थर्मोक्लाईन वर्षभर टिकून राहतो. परंतु त्याची पृष्ठभागाखालची खोली रुतुमान व हवामानाप्रमाणे बदलते. थोडक्यात म्हणजे खोल जलाशयातील पाणी तीन थरात विभागलेले असते. हे थर असे - वरचा थर अभिसरणाचा, मधला थर थर्मोक्लाईनचा आणि खालचा थर स्थिर राहणारा. (अभिसरण - द्रवामध्ये उष्णतेचे संक्रमण होत असताना कणांची हालचाल होऊन प्रवाह निर्माण होतात. यालाच अभिसरण असे म्हणतात. पाण्याचा पृष्ठभाग सूर्यप्रकाशाने गरम होतो व रात्री थंड होतो त्यामुळे वरच्या थरात अभिसरण होते. )

पृष्ठभागावरील अभिसरणाच्या थरातील गरम पाण्यात हवा सतत विरघळत असते. तसेच वाऱ्यामुळे पाण्यात हवा मिसळण्याचे कार्य होत असते. यामुळे येथील पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन आढळतो. पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असलेले लोह व मँगेनीज यांचे क्षार अभिसरणामुळे पृष्ठभागालगतच्या पाण्यात मिसळले गेले की तेथील ऑक्सिजनमुळे त्यांचे ऑक्सिकरण होते. अशी तयार झालेली संयुगे पाण्यात अविद्राव्य असतात त्यामुळे ती अभिसरणाच्या थरातून खालच्या थरात व तेथून पाण्याच्या तळाशी जातात. या तळाशीच लोह व मँगेनीज यांचे क्षार पाण्यात विरघळतात.

म्हणजे सर्वसाधारणपणे सांगायचे झाल्यास उन्हाळा व हिवाळयातील पाण्याच्या अभिसरणामुळे पूर्ण मिसळण्याच्या क्रियेचा काळ सोडला तर इतर वेळी पृष्ठभागावरील गरम पाण्यात लोह व मँगेनीज यांचे क्षार विशेष प्रमाणात सापडत नाहीत. थर्मोक्लाईनच्या खालच्या स्थिर थरातील पाण्यात ऑक्सिजन नसतो व असला तरी तो अतिशय अल्प प्रमाणात असतो. याचे कारण म्हणजे कार्बनी पदार्थांचे ऑक्सिकरण होत असताना ज्या रासायनिक क्रिया होतात त्यामध्ये हा ऑक्सिजन वापरला जातो. यामुळे पुन्हा कार्बन डाय ऑक्साईड वायु (कार्बोनिक आम्ल) तयार होता व त्यामुळे पाण्याचा पी.एच्. कमी होतो. ( कार्बोनिक आम्ल - H2CO3 पाण्यात कार्बन डाय ऑक्साईड विरघळल्याने हे आम्ल तयार होते.) पाण्यात वाहून आलेल्या दगड, मातीतील लोह वा मँगेनीज विरघळण्यासाठी या कमी झालेल्या पी.एच्. ची मदत होते.

याशिवाय पाण्यात ऑक्सिजन नसल्यामुळे सल्फेटचे सल्फाईडमध्ये रूपांतर होऊन पाण्यात दुर्गंधी निर्माण करणारे हैड्रोजन सल्फाईड, फेरस सल्फाईड यासारखी द्रव्ये तयार होतात. तसेच कार्बनी पदार्थांचे विघटन होऊन रंगद्रव्ये, वाईट चव व घाण वास असणारे पदार्थ तयार होतील अशा क्रियांना चालना मिळते. थर्मोक्लाईनच्या खालच्या बाजूस असलेल्या शांत व स्थिर अशा पाण्यात पुढील गुणधर्म आढळून येतात. ऑक्सिजनची उणीव, कार्बन डाय ऑक्साईडचे जास्त प्रमाण, शुद्ध पाण्याच्या पी. एच्. पेक्षा कमी पी. एच्. याशिवाय लोह, मँगेनीज व सल्फाईड ही खनिजे ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात असतात त्या ठिकाणी त्यांचे विद्राव्य क्षार आणि बेचव व दुर्गंधी निर्माण करणारे पदार्थही या पाण्यात आढळतात.

थर्मोक्लाईनच्या वरच्या थरात शेवाळे व कर्बग्रहणक्रियेसाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असणाऱ्या लहान पाणवनस्पतींच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती असते. कार्बन डाय ऑक्साईड वायूमधील कार्बन ग्रहण करीत असताना या वनस्पती ऑक्सिजन बाहेर सोडतात त्यामुळे पी.एच्. वाढतो आणि लोह व मँगेनीज यांचे ऑक्सिकरण होण्यास आणखी पोषक वातावरण निर्माण होते. याउलट प्राणीवर्गातील जीवाणु कर्बग्रहणक्रिया करीत नसल्याने त्यांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. व त्यामुळे हे जीवाणु जेथे अन्न मुबलक असेल तेथे स्थलांतर करू शकतात. पृष्ठभागावरील पाण्यातील शेवाळयाचा उपयोग प्राणीवर्गातील जीवाणूंना अन्न म्हणून होतो. जास्त खोलीवरही असे शेवाळे आढळते. जलाशयाच्या तळातील शेवाळे भिन्न प्रकारचे असते. शिवाय पृष्ठभागावरील निर्जीव शेवाळे पाण्याच्या तळाशी जाते आणि तेथे ते कुजते. हे जीवाणू कुजणारे शेवाळे व पाण्याच्या तळाशी बसणारे इतर कार्बनी पदार्थ यांचा अन्न म्हणून उपयोग करतात.

अवरोधक जलाशयात पाणी साठविले असता पाण्याचे नैसर्गिकरीत्या शुद्धीकरण होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. पण त्याबरोबरच त्यात काही हानीकारक बदल घडण्याची शक्यता असते. या पुस्तकात ज्या अनेक गोष्टींची चर्चा केली आहे त्यातील पहिली गोष्ट म्हणजे परिचालकांना जलाशयातील परिस्थितीचे शक्य तेवढे नियंत्रण कसे करता येईल याविषयीची माहिती असणे. पाणीपुरवठायोजनेमध्ये पाण्याच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांपैकी ही दुसरी पायरी आहे.
मूलभूत तत्वे -
पाणी एका जागी साठवून ठेवले असताना खालील फायदे होतात -
१)अवसादन क्रियेमुळे पाण्यातील गाळ तळाशी बसतो.
२)सांडपाणी व मलजल मिसळल्यामुळे पाणी पाणी दूषित झाले असल्यास पाण्यात जीवाणू आढळतात. पाणी साठविण्याच्या क्रियेमध्ये जीवाणूंना जगण्यास प्रतिकूल अशी परिस्थिती निर्माण होते.
३)पाण्यात ऑक्सिजन विरघळतो व त्याच्या रासायनिक क्रियेमुळे पाण्यातील अशुद्ध द्रव्यांचे स्वरूप बदलते.
या शुद्धीकरणाच्या क्रियांबरोबरच खालील हानीकारक क्रियांमुळेही पाण्याच्या दर्जात फरक पडतो.
१)पाणी साठविल्यामुळे विशिष्ट जीवाणूंची वाढ होते व त्यांच्या क्रियेमुळे पाण्याचा दर्जा खालावतो.
२)पाण्याबरोबर माती व खडक यांच्यातील लोह व मँगेनीज वाहून येतात. त्यांचे अपचयन होऊन ते पाण्यात विरघळतात.

जलाशयावर प्रयोगशाळांचे नियंत्रण

प्रयोगशाळांचे नियंत्रण
जलाशयावर प्रभावी नियंत्रण ठेवणे हे जलाशयातील परिस्थितीसंबंधी परिचालकांना किती ज्ञान अहे यावर अवलंबून असते. जेथे कर्मचारी वर्ग मर्यादित असतो अशा लहान जलाशयांच्या बाबतीत प्रत्यक्ष देखभाल व प्रयोगशाळेतील क्रियापद्धतींचा वापर करणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. म्हरून येणाऱ्या अडचणींचे स्वरूप व उपलब्ध सोयी यांचा विचार करूनच नियंत्रणाची मर्यादा ठरवावी लागते. तथापि नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले पाणी शुद्ध करण्यासाठी त्याचे गुणधर्म माहीत असणे जरूर असते. यासाठी पी.एच्.,गढूळपणा, क्लोरिनची गरज,व कॉलिफॉर्म जीवाणू परीक्षांचा उपयोग नियमितपणे करण्यावर भर दिला पाहिजे.
खोल पाण्यासाठी वापरावयाचे नमुना संच
जलाशयाच्या किंवा सरोवराच्या पाण्यांचे एखाद्या विशिष्ट खोलीवरचे नमुने घ्यावयाचे असतीलतर एक ठराविक प्रकारचे उपकरण वापरावे लागते. शास्त्रीय उपकरणे विकणाऱ्या कंपन्यांकडून ते विकत घेता येते. आकृती एकमध्ये, कोठेही सहज तयार करता येईल असे उपकरण दाखविले आहे. यामध्ये, एक लिटर मापाची, रूंद तोंडाची, प्लॅस्टिकची बाटली पितळी पट्ट्यात बवविलेली असून बाटली पाण्यात बुडेल इतके वजन त्यास लाविलेले असते. (प्लॅस्टिकची बाटली वापरल्यास काचेच्या बाटलीप्रमाणे ती फुटण्याची भीती राहात नाही.) रबरी बुचामध्ये १/ ४ व्यासाची दोन भोके पाडून आकृतीत दाखविल्याप्रमाणे त्यात दोन तांब्याच्या नळया बसविलेल्या असतात. त्यातील लांब नळीवाटे पाणी बाटलीच्या तळाशी सोडले जाते व आखूड नळीवाटे हवा बाहेर निघून जाते. ज्या खोलीवरचा नमुना घ्यावयाचा त्या खोलीपर्यंत हे उपकरण दोरीने खाली सोडून दोरीला जरा हिसका देण्यात येतो. (अ- तांब्याची नळी. ब - रबरी बूच. क - एक लिटर मापाची रूंद तोंडाची प्लॅस्टिकची बाटली. ड - आवश्यक तेथे रिव्हेट केलेल्या पितळी पट्ट्या. इ - तांब्याची नळी. फ - रबरी बुचे. ग - दोरी. ह - स्प्रिंग) यामुळे दोरीच्या टोकाची स्प्रिंग ताणली जाऊन नळयांना बसविलेली रबरी बुचे सहज निघून येतात व त्या खोलीवरचे पाणी बाटलीत शिरते. हे उपकरण पृष्ठभागावर ओढून घेतले की बाटलीचे मोठे बूच व नळया काढून टाकण्यात येतात. आणि त्याला नेहमीचे साधे बूच बसविण्यात येते. नंतर दुसरी बाटली या उपकरणात बसवून दुसरा नमुना घेण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येतो.

जलपरीक्षेतून निर्धारित करावयाच्या बाबी
नमुना घेतलेल्या पाण्याचे तापमानाची प्रथम नोंद करणे आवश्यक असते. पाण्याच्या साठ्यातील प्रत्येक जागी पाण्याचे पाण्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात. उदा. गढूळपणा, पी. एच्., अल्कता, विरघळलेला ऑक्सिजन, लोह व मँगेनीज यांचे प्रमाण प्रत्येक जागी निरनिराळे असते. पाण्याचे गुणधर्म ठरविणाऱ्या या घटकांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी पाण्याचे विश्लेषण करावे लागते. जलाशयातील विशिष्ट निवडक ठिकाणी जीवाणूंचे प्रमाण किती आहे हे ठरविण्यासाठी जीवाणूंचे सूक्ष्मदर्शी परीक्षण करावे लागते व त्यावरून जीवाणूंच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. (सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने पाण्याच्या थेंबातील जीवाणू प्रत्यक्ष बघता येत असल्याने विविध प्रयोगपद्धतींनी या जीवाणूंचे वर्गीकरण करता येते व यावरून विशिष्ट जीवाणू जास्त प्रमाणात असल्या त्यांच्या वाढीस साहाय्यक ठरणारी कारणे शोधून काढता येतात.) या संपूर्ण विश्लेषणामुळे थर्मोक्लाईनची खोली तसेच त्यावरील पृष्ठभागालगतचा भाग व खालचा स्थिर पाण्याचा भाग यांनी किती क्षेत्र व्यापले आहे याची माहिती होते. बहुद्वार जलग्रहणकेंद्रांचा वापर करीत असताना व गाळवाहक नळातून तळाशी असलेले पूर्वीचे पाणी बाहेर सोडून देताना याचा फार उपयोग होतो. तथापि कित्येकवेळी पाण्याचे तापमान व त्यातील जीवाणूंचे प्रमाण एवढ्यापुरतेच जलपरीक्षण मर्यादित ठेवले तरी चालते.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे जलग्रहणकेंद्र ज्या ठिकाणी व जितक्या खोलीवर आहे तेथील पाणीच शुद्धीकरण व्यवस्थेकडे जात असल्यामुळे शुद्धीकरणासाठी नेण्यात येणाऱ्या पाण्याचे गुणधर्म व त्याचा दर्जा जलग्रहणकेंद्राजवळच्या पाण्यासारखाच असतो. जलाशयातील इतर ठिकाणच्या पाण्याचे गुणधर्म यापेक्षा वेगळे असू शकतात. त्या पाण्याचे गुणधर्म खोल पाण्याच्या गुणधर्मापेक्षा अगदी भिन्न असतात. त्यामुळे पृष्ठभागालगतच्या नमुन्यांवरून खोल पाण्याच्या गुणधर्माविषयी काहीच अंदाज बांधता येत नाहीत. म्हणून जलाशयातील ठराविक ठिकाणच्या व ठराविक खोलीवरील पाण्याच्या गुणधर्माची माहिती करून घ्यावयाची असेल तर खोल-पाणी-नमुना संचाचाच वापर करावा लागतो. असा नमुनासंच उपलब्ध नसेल तर शुद्ध करावयाच्या पाण्याचा दर्जा समजण्यासाठी शुद्धीकरणकेंद्राकडे जाणाऱ्या पाण्याचे नमुने घेऊन त्यांचे परीक्षण करावे लागते.

पाणी पुरवठा स्थानांचे संरक्षण

जलशुद्धीकरण केंद्रावरील परिचालकांना पाणी पुरवठ्याच्या जागा दूषित होऊ नयेत म्हणून फारच थोड्या प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. कारण पाणी दूषित करणार्‍या सर्व गोष्टींवर तसे नियंत्रण ठेवणे शक्य नसते. पाणथळाचे क्षेत्र (पांणथळ किंवा अपवाह क्षेत्र - पावसाचे पाणी जेवढ्या भागातून वाहात येऊन जलाशयास वा नदीस मिळते त्या सर्व भागाचे क्षेत्रफळ म्हणजे पाणथळ होय.) विकत घेण्यास परवडेल एवढे लहान असेल व त्याचा उपयोग पाणी पुरवठ्यासाठीच राखून ठेवता येत असेल किंवा विहिरी व झरे यांचा उपयोग फक्त पाणी पुरवठ्यासाठी करणे शक्य असेल तरच पाणी दूषित होऊ नये म्हणून थोडीफार खबरदारी घेता येते परंतु अशावेळी सुद्धा जर रासायनिक दृष्ट्या दूषित अशा पाण्याच्या दूरच्या साठ्यातून पाणी झिरपून विहिरीच्या पाण्यात मिसळले तर असे नियंत्रण ठेवणे अशक्य होते. सर्वसाधारणपणे सांगायचे झाले तर पाण्याच्या प्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी शासकीय यंत्रणेवर अवलंबून राहणे आवश्यक आहे. तसेच कमीत कमी खर्चात व जास्तीत जास्त प्रभावी शुद्धीकरण होण्याच्या दृष्टीने पाण्याच्या उपलब्ध साठ्याचे असे संरक्षण होणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
पाण्याच्या प्रदूषणास आळा घालणे

पाण्याच्या साठ्याचे संरक्षण हे पाणीपुरवठ्यासकट सर्व साधनसंपत्तीचा विनियोग करणाऱ्या शासनसंस्थेकडे सोपविण्याची सध्याची पद्धत असते. म्हणून खाली दिलेल्या कार्याकरिता निश्चित योजना तयार कराव्या लागतात.

अ)विद्यमान प्रदूषणाच्या जागा व प्रदूषणाची कारणे शोधून काढणे
ब) दूषित झालेले पाणी ठराविक गुणवत्तेपर्यंत शुद्ध करण्यासाठी किंवा ते जास्त दूषित होऊ नये म्हणून शहरातील मलजल तसेच कारखान्यातील उत्सर्जित पाणी शुद्ध करण्यासाठी यंत्रणा उभारणे.
क) विद्यमान व संभाव्य अशा कारणांकरिता पाण्याचा उपयोग करणे.

साधारणपणे लोकांच्या गरजेनुसार, या सर्व उपयोगांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या वापरास अग्रक्रम दिला जातो. जलशुद्धीकरण केंद्रावरील परिचालकांना शासनाने आखलेल्या योजनेविषयी सर्व माहिती असणे जरूर असते. कारण त्यामुळे त्यांच्या अखत्यारीतील पाण्याच्या साठ्याची देखभाल करण्याच्या कामात, जरूर पडल्यास योग्य प्रकारे सहभागी होता येते. यासंबंधीचे नियम व योग्य कसोट्या समजून घेण्यासाठी पृष्ठभागावरील जलप्रदूषणावरील तांत्रिक समितीचा अहवाल, आंतरराष्टीय पाणीपुरवठासंघटना १९६१, ही नियमपुस्तिका वाचावी.

पाणथळाचे क्षेत्र लहान असेल व त्याची किंमत अल्प असेल तर ते विकत घेणे शक्य असते व अशा स्वत:च्या मालकीच्या सर्व क्षेत्रावर नियंत्रण ठेवणे व प्रदूषणाची उगमस्थाने नाहीशी करणे शक्य होते. शिवाय जंगलांची वाढ करून मातीची धूप थांबविता येते. आणि दलदलीच्या प्रदेशातील पाण्याचा निचरा करून रंगद्रव्ये तयार होण्यासारखी परिस्थिती उद्भवणार नाही अशी काळजी घेता येते. (रंगद्रव्ये - वनस्पतीतील रंगभरण करणारी द्रव्ये. उदा. क्लोरोफिल). वनस्पतीच्या कुजण्यामुळे त्या भागातून वाहणाऱ्या पाण्यात वनस्पतिज रंगद्रव्ये मिसळलेली असतात. दलदलीच्या जागेचा निचरा केल्यास उथळ डबकी नाहीशी होतात. अशा उथळ डबक्यात शेवाळयाच्या वाढीस अनुकूल परिस्थिती असते. व त्यामुळे तेथे शेवाळयाची वाढ होते. (शेवाळे - पाण्यात वाढणाऱ्या हिरव्या वनस्पती. डोळयाने सहज दिसणाऱ्या वनस्पतींना आपण शेवाळे म्हणतो. त्यासारख्याच अतिसूक्ष्म वनस्पतीही पाण्यात असल्याने त्यांनाही शेवाळे हाच शब्द वापरला आहे. )पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे शेवाळे पाण्याच्या साठ्यात मिसळले जाऊन त्याचा जलाशयात बीज म्हणून उपयोग होण्याची शक्यता असते. उथळ डबकी नाहीशी झाली की आपोआपच पुढच्या गोष्टी टळतात. पाण्याला दुर्गंधी येऊ नये व पाणी बेचव होऊ नये यासाठी जलाशयातील शेवाळयाच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे हा योजण्यात येणार्‍या इतर उपायातील पहिला टप्पा आहे.

घन कचर्‍याचे व्यवस्थापन

प्रास्तविक
वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यात घन कचर्‍याचे एकत्रीकरण व त्याची विल्हेवाट ही एक मोठी खर्चाची तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्वाची समस्या बनली आहे. लोकसहभागाने या समस्येवर तोडगा काढणे ही एक काळाची गरज आहे. यादृष्टीने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान ही अतिशय स्वागतार्ह योजना शासनाने सुरू केली आहे. त्यात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेणे आवश्यक आहे. असे झाले तर ही समस्या, समस्या न राहता पर्यावरण रक्षणाबरोबरच ते एक उत्पन्नाचे साधन बनू शकेल.
घनकचरा निर्मिती
घन कचर्‍याची निर्मिती घराघरातून होत असल्याने गोळा होणार्‍या घनकचर्‍याचे प्रमाण वा त्याचा दर्जा यावर नियंत्रण ठेवता येत नाही. परिणामी त्याची साठवण, वाहतूक व्यवस्था वा त्यावरील प्रक्रिया यांचे डिझाईन करण्यासाठी सांख्यिकी पद्धतींचा वापर करावा लागतो. साहजिकच ही व्यवस्था सर्व परिस्थितीत कार्यक्षम राहण्यासाठी अधिक लवचिक व सुसज्ज ठेवणेे आवश्यक ठरते. यासाठी लागणारी साधन सामुग्री, मनुष्यबळ व आर्थिक तरतूद बहुतेक नगरपालिकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. त्यामुळे कचरा पेटीतून भरून वाहणे, तेथेच कुजून दुर्गंधी पसरणे, पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित होणे व शहरी परिसर अस्वच्छ दिसणे या गोष्टी सर्वसामान्य झाल्या आहेत. गोळा केलेला कचराही शहराबाहेर उघड्यावर टाकून दिल्याने तेथेही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असलेले बहुतेक ठिकाणी दिसून येते.
घन कचरा स्वत: वाहून जात नाही. तो उचलून न्यावा लागतो यामुळे प्रदूषण त्या जागीच मर्यादित राहत असले तरी न वापरातील सर्व जागा हळुहळू कचर्‍याने व्यापल्या जातात आणि प्रत्यक्ष कृतीशिवाय स्वच्छता होत नाही. केवळ कायदे करून वा नगरपालिकेची कार्यक्षमता वाढवून या समस्येचे निराकरण करता येणार नाही. याउलट लोकांची मानसिकता बदलली आणि त्यांनी जाणीवपूर्वक यात सहभाग घेतला तर एरवी अशक्य व खर्चिक वाटणारी ही योजना अत्यंत कमी खर्चात प्रभावीपणे यशस्वीपणे राबविता येईल.
घनकचरा निर्मिती

शहर घनकचरा निर्मिती (प्रतिदिन)
दिल्ली ४६०० मे. टन
चेन्नई ३५०० मे. टन
मुंबई ५००० मे. टन
पुणे १५२७ मे. टन
नागपूर ११०० मे. टन
नाशिक ४३५ मे. टन
कोल्हापूर २५० मे. टन
सांगली ५५ मे. टन
लोक सहभाग
शासनपुरस्कृत संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानातून लोक चळवळ उभी राहिली तर या अवघड समस्येवर प्रभावी उपाययोजना करता येणे शक्य आहे.
लोक सहभागातून खालील गोष्टी साधता येतील
. प्रदूषणकारक प्लॅस्टिक क्रॅरी बॅग ऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करणे.
. कचरा पेटीतच टाकणे व बाहेर सांडणार नाही याची काळजी घेणे.
. कचरा निर्मिती कमी करण्यासाठी वस्तूंचा पुर्नवापर करणे.
. कुजणारा, न कुजणारा, विषारी व घातक कचरा एकत्र न करता वेगवेगळया पिशव्यात वा डब्यात ठेवणे.
. व्यापारी पद्धतीच्या पुर्ननिर्माण प्रक्रियेसाठी कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या, काच, धातू एकत्र करून विकणे.
. कुजणारा कचर्‍याचे घरातच जीवाणू संवर्धन वा गांडूळ खत पद्धतीचा वापर करून खत तयार करणे व घराच्या बागेसाठी वापरणे वा बंद पिशवीतून विकणे.
. आपल्या भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे.
. जनजागृती अभियानात सक्रीय सहभाग घेणे.
. नगरपालिकेच्या कामावर नजर ठेवून कचरा साठणे वा अन्य हानीकारक घटनांकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे.
. नगरपालिकेच्या नियमांचे पालन करणे व स्वच्छता कार्यास हातभार लावणे.
घनकचरा प्रक्रिया पद्धती
शास्त्रीय जमीनभराव पद्धती
. खोलगट जमिनीवर कचरा व मातीचे थर टाकून रोलींग करणे
. सर्वात सोपी व कमी खर्चाची पद्धत
. जळावू वायू मिळण्याची योजना शक्य
. पडीक जमिनींचे सुपिक जमिनीत रुपांतर
. प्रदूषणाचा धोका
. नव्या नियमांनुसार या पद्धतीच्या वापरावर कडक निर्बंध
सेंद्रीय खत निर्मिती
. कचरा वर्गीकरण आवश्यक
. जीवाणु वा गांडुळांची वाढ करून कचर्‍याचे खतात रूपांतर किफायतशीर परंतु अधिक देखभालीची आवश्यकता
पूर्ण ज्वलन पद्धती
. खर्चिक परंतु प्रभावी पद्धत
. घातक विषारी तसेच वैद्यकीय कचर्‍यासाठी आवश्यक
. तांत्रिक संकल्पन योग्य असणे आवश्यक
विकेंद्रीत कचरा प्रक्रिया
. घरगुती वा छोट्या प्रमाणावर खतनिर्मिती
. वाहतूक खर्चात बचत आणि खताचा स्थानिक उपयोग शक्य
. अधिक किफायतशीर व उपयुक्त
. लोकजागृती व त्यांचा सक्रीय सहभाग आवश्यक
खर्चाचा तपशील
कचरा गोळा करणे ६४३ रू. प्रति टन
कचरा वाहतूक २४० रू. प्रति टन
कचरा प्रक्रिया व विल्हेवाट २५ रू. प्रति टन
वरील आकड्यांवरून असे दिसून येईल की घन कचरा योजनेच्या खर्चाचा फार मोठा हिस्सा कचरा गोळा करण्यात खर्च होतो. त्या मानाने कचरा प्रक्रिया व विल्हेवाटीसाठी अगदी कमी खर्च केला जातो. कचर्‍यावर योग्य प्रकारे प्रक्रिया करण्यासाठी सध्या फारसे लक्ष दिले जात नाही यामुळे योजनेच्या खर्चाचे वरील कोष्टक प्रमाणभूत मानता येणार नाही. तरीदेखील कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक हाच योजनेचा मुख्य खर्च आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.

गोळा झालेला कचर्‍याचे खत बनविल्यास व्यावसायिक फायद्याचा उद्योग होऊ शकतो हे लक्षात आल्याने अनेक खासगी संस्था स्वखर्चाने कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यास पुढे येत आहेत. मात्र कचरा गोळा करण्याचे खर्चिक काम नगरपालिकेस करावे लागत असल्याने अशा योजनांचे योग्य मूल्यमापन होणे जरुरी आहे. नगरपालिकेनेच हे काम हाती घेतले तर नगरपालिकेस ही योजना फायद्याची ठरू शकेल.

Wednesday, January 5, 2011

Root out Corruption, not the Tree

India is passing throuh a very critical stage with exposure of corruption charges against Government Officers, Political Leaders and big Corporates. Media and opposition parties are busy in cashing on the situation and stalling the Government machinery, stopping the projects and demanding destruction of illegal projects. General public is rejoicing the stories and fight between the political parties and has started doubting each and every project and development work as the handiwork of people and officers with corrupt motive.This is most dangerous situation and may hamper the development of India irrevokably.Some essential projects like Nuclear plant are also facing opposition from many quarters.

No doubt, corruption needs to be rooted out and the corrupt people should be brought to book, but we should be careful to see that the government, economy and development work needed for India's growth and prosperity do not get badly affected. Removal of corruption disease should be done with expert sergery with no harm to patient. We have read the story in childhood that a fool appointed to safeguard the king uses sword to kill the fly on the nose of king. Even though the tree is infested with termites, cutting the tree completely is not the solution.

What is needed is careful and prolonged treatment allowing time and resources to replenish the damaged system with new healthy alternatives and evolving a system to prevent further occurance of such disease. Cancer treatment is best example. In this case radiation dose and medicine is given in such proportion that rapidly multiplying cells are killed. There is temporary losss of some heathy cells also but the system is capable of rejevunation.

All political parties should come together, think and devise an effective methodology to deal with corruption charges,keep secrecy where needed, keep monitoring its impact on growth and development projects, should prevent action which could harm the interests, credibility and strength of our country in international scenario.

Infra-structural developments, if done illegaly and through corrupt practises should be utilised for essential activities like defence, research institutes, education or health services instead of destroying them. Agencies which warn and expose irregularities and corruption should be strengthened by government funding to keep them away from foreign interests. Their role is essential as preventive medicine and should not be considered as unwanted and troublemaking activity.

Environmental preservation is crucial for India. But there is lot of ignorance about its importance in industrialists, project planners and technocrats. Laws for environmental protection in India are sufficiently strong but tendency to violate them has become normal practice. Project consultants generally ignore or give cosmetic importance to this requirement. Financial provisions for rehabilitation and environmental protection are considered as burden and are managed instead of taken care for.

Projects get stuck with opposition from NGOs and affected people and the blame goes to the advisors and pollution control authorities more than the offenders.The damage once done to environment cannot be undone by destroying the project. It would add to national loss, environmental loss,economical disaster for small investers and unemployment. Remedy in such case would be the punishment in the form of compensatory environmental upgradation of some other area which needs financial resources.This would enable government to conserve environment on national scale if not at local level and would get infra-structures at no cost for essential non polluting activities.