Sunday, July 3, 2016

मराठी अक्षरांची नवी ओळख


मराठी वर्णमाला ही उच्चारानुसार रचलेली आहे, मात्र मराठी अक्षरे तयार होताना त्यात रेखीव संगती आढळत नाही.
साहजिकच मराठी भाषा शिकणार्‍या मुलांना मराठी अक्षरे लक्षात ठेवण्यासाठी बरेच प्रयास करावे लागतात. अक्षरांच्या रचनेतील समानता पाहून त्यांची फेरमांडणी केली तर मराठी अक्षरे ओळखणे, लक्षात ठेवणे व लिहिता येणे सुलभ होऊ शकते.
स्वर -
अक्षरांच्या रचनेनुसार स्वरांच्या खालीलप्रमाणे जोड्या करता येतील.
अ आ
इ ई
उ ऊ
ए ऐ
ओ औ
अं अ:
वरील जोड्यांमध्ये पहिल्या अक्षरांच्या उच्चार र्‍ह्स्व तर दुसर्‍या अक्षरांच्या उच्चार दीर्घ आहे.
व्यंजने -
गमभन ही चार अक्षरे रचनेच्या दृष्टीने समान आहेत.
याचं पद्धतीनेच बाकी सर्व अक्षरांचेही खालीलप्रमाणे गट पाडतां येतील.
व ब क ख
प फ ष
र स ख श
ट ठ द
ड इ ई ह
त ल न
य थ
च ज हे एकमेकाविरुद्ध आधाराचे आहेत
घ ध छ
बाराखडी-
स्वरांप्रमाणे व्यंजनांच्याही उच्चाराप्रमाणे जोड्या करता येतील.
क का
कि की
कु कू
के कै
को कौ
कं क:
याचप्रकारे सर्व व्यंजनांच्याही जोड्या करता येतील,
अक्षरे ओळखण्यासाठी साहाय्यभूत ठरणारे अनेक खेळ या कल्पनेतून विकसित करता येतील

No comments:

Post a Comment