Tuesday, July 9, 2013

अकौंटिंग भाग ६ - वॅट व सीएसटी टॅक्सेस

मालाच्या खरेदी विक्रीवर राज्यसरकारतर्फे वॅट टॅक्स लावला जातो. वस्तूंच्या प्रकाराप्रमाणे वॅटचे दर १२.५ टक्के किंवा ५ टक्के असे ठरविलेले  असतात. खरेदी करताना वॅट द्यावा लागतो तर विक्री करताना वॅटची रक्कम उद्योगाकडे जमा होते. एकाच वस्तूवर दोनदा टॅक्स द्यावा लागू नये या हेतूने खरेदीचे वेळी दिलेल्या वॅटच्या रकमेची  वजावट म्हणून मिळते ( यासाठी पर्चेसच्या पावत्या दाखवाव्या लागतात.)  व जमा वॅट व दिलेला वॅट यातील फरक शासनाकडे भरावा लागतो.

 पर्चेस व सेल यांची बिले करताना त्यात वॅट्चा समावेश करावाच लागतो. त्यामुळे वॅट टॅक्स नावाचे खाते उघडून त्यात याची नोंद करावी लागते.

 म्हणजे १००० रु. किमतीचा माल विकताना १००० + १२५ ( १००० रुपयांवर १२.५ टक्के दराने येणारा वॅट टॅक्स ) असे ११२५ रुपयांचे बिल करावे लागते.

रिसिट व्हाउचरला त्याची नोंद खालीलप्रमाणे करता येईल.
 -----------------------------------------------------
  कॅश    डेबिट ११२५ रुपये
  विक्री                     क्रेडिट १००० रुपये
  १२.५% वॅट                क्रेडिट   १२५ रुपये
--------------------------------------------
     ११२५ रुपये          ११२५ रुपये
----------------------------------------
अशी केली जाते. वॅट ५ % टक्के असेल तर वरील नोंदीत त्याप्रमाणे बदल होतील.

वॅटशिवाय केंद्र शासनाचा सीएसटी टॅक्स २% टक्के असतो. तो राज्याबाहेर मालाची विक्री झाली तर लागू होतो. त्याचीही नोंद सीएसटी खाते तयार करून ठेवली जाते व त्याचा भरणा शासनाकडे करावा लागतो. वरील उदाहरण सीएसटी टॅक्ससह असे होईल.
----------------------------------------------

कॅश    डेबिट १०२० रुपये

  विक्री                     क्रेडिट १००० रुपये

       २% सीएसटी          क्रेडिट    २० रुपये

--------------------------------------------

     १०२० रुपये            १०२० रुपये

----------------------------------------

अशा वेळी १०२० रुपयांवर लागणारा वॅट ज्याला विक्री झाली त्याने त्या राज्यात भरावा लागतो.अशी केली जाते. वॅट ५ % टक्के असेल तर वरील नोंदीत त्याप्रमाणे बदल होतील.

 याशिवाय बिलामध्ये पॅकिंग  व फॉर्वर्डिंग चार्जेस, ट्रॅन्स्पोर्टेशन चार्जेस यांचा समावेश केला जातो. मात्र सीएसटी मालाच्या रकमेवरच लागू होतो.
कॅश    डेबिट १२७० रुपये

  विक्री                     क्रेडिट १००० रुपये

      २% सीएसटी            क्रेडिट    २० रुपये

पॅकिंग  व फॉर्वर्डिंग चार्जेस      क्रेडिट     ५० रुपये

ट्रॅन्स्पोर्टेशन चार्जेस            क्रेडिट   २०० रुपये

--------------------------------------------

     १२७० रुपये            १२७० रुपये

----------------------------------------

वरील व्यवहार रोखीने नसल्यास सेल व्हाउचरमध्ये याची नोंद क्रावी लागेल व त्यात डेबिट बाजूला कॅश ऎवजी ज्या पार्टीला माल उधारीवर विकला त्या पार्टीचे नाव असेल.

पर्चेसच्याबाबतीत  वरील उदाहरणाप्रमाणे पेमेंट व पर्चेस व्हाउचर करावी लागतील.

No comments:

Post a Comment