Saturday, July 13, 2013

अकौंटिंग भाग ११ - अक्रुअल व डिफरल

उद्योग वा व्यवसायामध्ये  निर्धारित सेवा कालावधीच्या आधी वा नंतर पैसे दिले वा घेतले जातात. अशा कालावधी दरम्यानच्या काळातील अकौंटिंगमध्ये याची योग्य दखल न घेतल्यास त्या वेळची आर्थिक स्थिती ठरविता येत नाही. यासाठी प्रत्यक्ष पैशांची देवघेव झाल्याची फोड करून ती संपूर्ण निर्धारित कालावधीमध्ये विभागून देण्य़ाची गरज असते. मात्र  प्रत्येक दिवसाला अशा नोंदी करणे क्लिष्ट ठरू शकते. यासाठी त्या कालावधीच्या सुरुवातीस वा शेवटच्या दिवशी अशा नोंदी केल्या जातात.   यालाच एक्रुअल व डिफरल नोंदी असे म्हणतात.
अक्रुअल्स (Acruals)
 निर्धारित सेवा कालावधीच्या नंतर जर्नल व्हाउचरला नोंद होणार्‍या एकत्रित खर्च वा उत्पन्नाची नोंद सेवा कालावधीच्या शेवटच्या दिवशी केली जाते उदाहरणार्थ   कर्मचार्‍यांचा पगार महिना संपल्यानंतर पुढच्या महिन्याच्या एक तारखेला दिला जातो. मात्र त्या महिन्यातील प्रत्येक दिवशी उद्योग त्या कर्मचार्‍याला पगारापोटी खी देणे लागतो. त्याची एकत्रित रक्कम म्हणजेच एकूण महिन्याचा पगार महिन्याच्या शेवटच्या दिवशी क्रेडिट ( देणे) म्हणून दाखविला जातो.  त्याची नोंद अशी केली जाते.
----------------------------------------------------------------------
३० जून २०१३ सॅलरी एक्स्पेंसेस ( पगार खर्च)    डेबिट २५०००रु.
           सॅलरी अक्रूड ( साठलेली) देणे             क्रेडिट २५०००रु.
( सॅलरी अक्रूड  १ जुलै २०१३ रोजी देणे)
---------------------------------------------------------------
आता जून महिन्याच्या अकौंटिंगमध्ये त्या महिन्याच्या सॅलरी एक्स्पेंसेस योग्य प्रकारे नोंद झाली आहे.
अक्रुअल्सची उदाहरणे
१. सॅलरी
२. पूर्वीच्या कामाचे देणे
३. इन्टरेस्ट (  जमा होणारे व्याज)
४. बिल न पाठविलेले येणे

डेफरल्स (Deferrals)
 निर्धारित सेवाकालाच्या सुरुवातीसच जर्नल व्हाउचरला उत्पन्न वा खर्चाची नोंद झाली असेल तर सेवाकाल संपेपर्यंत त्याचा प्रभाव असल्याने त्याची अकौंटिंगला डेफरल्स म्हणून केली जाते. उदाहरणार्थ वर्षाच्या विम्याची रक्कम वर्षाच्या सुरुवातीसच भरली असेल तर त्याची प्रीपेड एक्स्पेंसेस म्हणून खालीलप्रकारे  केली जाते
------------------------------------------------------------------
१ जून २०१३ प्रीपेड एक्स्पेंसेस    डेबिट १२०००रु.
          कॅश                           क्रेडिट १२०००रु.
( १जून २०१३ ते ३१ मे २०१४ पर्यंतच्या वार्षिक विम्याची रक्कम)
-------------------------------------------------------------
 याचा अर्थ विमाची रक्कम या कालावधीत प्रीपेड एक्स्पेंसेस या खात्याला असेट म्हणून नोंदली जाते. दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी यातील एका महिन्याचा विमा हप्ता असेट कमी झाल्याचे दर्शवेल.
---------------------------------------------------------------
३० जून २०१३ इन्शुअरन्स एक्स्पेंस   डेबिट १०००रु.
               प्रीपेड एक्स्पेंसेस             क्रेडिट १००० रु.
(जून महिन्याच्या  विम्याची रक्कम)
-------------------------------------------------------------

डेफरल्सची उदाहरणे
१. प्रीपेड इन्शुअरन्स
२. प्रीपेड रेंट
३. ऑफिस सप्लाईज
४. डेप्रिसिएशन
 

No comments:

Post a Comment